
ब्रॅण्ड स्टोरी
आपले स्वप्नं… आपली मिसळ… मराठी मिसळ!!! स्वप्नातून सत्याकडे… चवीतून संस्कृतीकडे…”
एक सक्रिय, सकारात्मक, सृजनशील, उत्साही, अनुभवी, पन्नाशी पार केलेला हरहुन्नरी व्यावसायिक चित्रकार… अनेक वर्षे लहान-मोठ्या उद्योगांना दिशा आणि ऊर्जा देणारा मार्गदर्शक… उद्योजक मित्र… अक्षरमित्र.. मिसळप्रेमी!!!
एक लहानसं मराठी रेस्टॉरंट सुरू करण्याचं त्याचं जुनं स्वप्नं….. पण वेळ, परिस्थिती, अडचणी आणि विविध जबाबदाऱ्या या सगळ्यांत ते स्वप्नं कुठेतरी हरवलं होतं. आणि अचानक एके दिवशी संधी समोरून चालत आली. ऑफिस जवळील वर्दळ असलेल्या रस्त्यावरील रोड टच जागा.. अगदी २५ वर्षांपूर्वी नजरेत फिट बसली होती तीच जागा… जागेच्या मालकाने समोरून दिलेली ऑफर आणि हृदयात धडधडणारी एकच इच्छा.. "आपली मिसळ… मराठी मिसळ… आपली संकल्पना, आपला व्यवसाय …!"
पत्नीचा (उल्का) नेहमीप्रमाणे काळजीयुक्त विरोध पण नंतर मात्र संपूर्ण सहकार, एक तरुण धडपड्या स्थानिक व्यवसायिक मित्राची जोशपूर्ण साथ (आदित्य), उद्योजक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणाचा ठाम होकार (विक्रम), आणि पन्नाशी पार केलेला निवृत्त पण तितकाच ऊर्जावान व्यवस्थापक मित्र सोबतीला…(कैलास)
सर्वांच्या साथीला ऑफिसमधील सहकारी संकेत, सागर, अॅलेन, करण, प्रियंका, आर्या, मित्र अनिल, केदार..आता सर्वांचे एकच ध्येय.. एकच दिशा आणि सर्वांची प्रचंड मेहनत, वेळेची-पैशांची-संकल्पनांची गुंतवणूक, ऊर्जा, उत्साह, अनेक अडथळे त्यावर मात करत प्रत्यक्षात “मराठीमिसळ” या मराठमोळ्या ब्रॅंडचा जन्म… कोणताही गाजावाजा न करता राजकारणी आणि सेलेब्रेटी यांना बाजूला सारून ७ ते ७० वयोगटातील पहिल्या ७ मिसळप्रेमी ग्राहकांच्या हस्ते दिनांक १४ जून २०२५ रोजी फीत कापून उद्घाटन!!!
आणि मग चव, भावना, संस्कृती, अभिमान आणि सर्व लहान थोर सहकारी,मित्र, हितचिंतक सर्वांचा सुरू होतो एकत्र प्रवास… आणि नवी घोषणा जन्म घेते.. “आपली मिसळ, मराठी मिसळ, स्वस्त महामस्त जबरदस्त.. खा बिनधास्त!!!”
ABOUT US
"मराठी मिसळ" — चव आणि संस्कृती यांचा झणझणीत संगम!
झणझणीत मिसळपाव हा खाद्यपदार्थ मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. "मराठी मिसळ" म्हणजे विविध क्षेत्रातील, विविध प्रांतातील चार मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन उभारलेला महत्त्वाकांक्षी ब्रॅंड!!! "मराठी मिसळ" ही फक्त एक मराठी खाद्यपदार्थ विकणारी जागा नसून, ती आहे मराठी घरगुती चव, संस्कृती, भावना आणि अभिमानाचा अनोखा संगम! महाराष्ट्रातील विविध प्रांतातील चव एकत्र आणत, प्रत्येक घासात मराठी अस्मितेचा स्वाभिमानी अनुभव देणारा हा मराठमोळा ब्रँड आहे.
मुंबई मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, कोल्हापुरी मिसळ, सोलापुरी मिसळ, सातार-सांगली मिसळ, कोंकणी मिसळ, खानदेशी मिसळ या सर्व जिल्ह्याची/प्रांतांची नावे असलेल्या प्रसिद्ध मिसळ आहेत. मात्र आम्ही असं ठरवलं की असं जिल्हा-प्रांत या पुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या मराठी लोकांना एकत्र आणणारी, सर्व मराठी लोकांना आपली वाटणारी, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी परंपरा, मराठी स्वाद, मराठी अभिमान, मराठी स्वाभिमान, मराठी कणा, मराठी बाणा दर्शवणारी - प्रेमाची-आपुलकीची-अभिमानाची मराठी मिसळ मार्केटमध्ये आणावी.
चार सक्रिय संस्थापक भागीदार, त्यांचा उत्साही वावर, मराठमोळा महिला स्टाफ, उत्तम लोकेशन, स्वच्छ सुरक्षित सुंदर वातावरण, चवदार वैविध्यपूर्ण पदार्थ, मिसळचा मॅजिकमिक्स मसाला, सातत्यपूर्ण घरगुती चव, आदरातिथ्याची आपुलकी, कल्पक ब्रँडिंग आणि स्थानिक मार्केटचा अभ्यास यांच्या जोरावर हा ब्रॅंड अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.
अनेक तरुण जोडपी, सुशिक्षित-सुसंस्कृत कुटुंब, गृहिणी, विद्यार्थी, रिक्षावाले, कष्टकरी या सर्वांसाठी मराठी मिसळ हा हक्काचा कट्टा बनला आहे. मराठी भाषिक इथे आपुलकीने आणि अभिमानाने येतात. तर अमराठी इथे मराठी खाद्यपदार्थानंविषयीची उत्सुकता, कुतूहल आणि वेगळा स्वाद अनुभवायला येतात. शेवटी सगळ्यांना आपली वाटेल अशी एक जागा रेस्टोरंट माध्यमातून आम्हाला तयार करायची होती. आणि त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. म्हणूनच “मराठी मिसळ” हे फक्त एक रेस्टोरंट नाही… तर तो समाजातील सर्व थरातील सर्व मराठी-अमराठी मनांना एकत्र आणणारा — आपुलकीचा, प्रेमाचा, संस्कृतीचा ब्रँड आहे.

VISION – आमचे स्वप्न
मराठी स्वाद संस्कृतीचा अभिमान जगभर पोहोचवणे. मराठी घराघरात, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, आणि पुढे संपुर्ण भारतात.. जगभरात मराठी मिसळ हा एक प्रसिद्ध, प्रिय, आणि विश्वासार्ह फूड ब्रँड बनवणे.
MISSION – आमचे ध्येय
-
प्रत्येक ग्राहकाला घरासारखी चव, आपुलकीची सेवा, आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता देणे.
-
मिसळीचे विविध प्रादेशिक स्वाद एकत्र आणून मराठी खाद्यसंस्कृतीचा तडका जगासमोर आणणे.
-
गृहिणी आणि बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
-
स्वच्छ, परवडणाऱ्या आणि चविष्ट घरगुती खाद्यसेवेचा नवा आदर्श निर्माण करणे.


VALUES – आमच्या मूल्यांचा पाया
-
🧡 मराठी अस्मिता: मराठी चव, मराठी भाषा, मराठी बाणा — हीच आमची ओळख.
-
🤝 आपुलकी व आदरातिथ्य: ग्राहक म्हणजे देव… आणि मिसळ म्हणजे प्रसाद. प्रत्येकाला घरचेपणा देणे आमची परंपरा.
-
🌶️ सातत्यपूर्ण चव व गुणवत्ता: प्रत्येक दिवस… प्रत्येक प्लेट… एकच उत्कृष्ट चव.
-
✨ प्रामाणिकपणा व पारदर्शकता: व्यवहार, सेवा आणि संवाद— सर्वकाही स्पष्ट आणि मनापासून.
-
🌱स्वच्छता व आरोग्य: अन्न म्हणजे विश्वास, आणि स्वच्छता म्हणजे त्या विश्वासाचा पाया.
-
🔥 नावीन्य आणि स्थानिकता: स्थानिक चवींसोबत नवकल्पना मिसळून नवा अनुभव देणे.
GOAL – आमचे उद्दिष्ट
-
🎯 १०० शाखांचा प्रवास — १ मे २०२८ पर्यंत
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी “मराठी मिसळ” चे १०० झेंडे महाराष्ट्रभर अभिमानाने फडकवणे.
-
🎯 प्रत्येक शहरात “एक मराठी मिसळ”
प्रत्येक शहरात — मराठी मिसळ हा एक विश्वासार्ह आपुलकीचे खाद्यकेंद्र बनवणे.
-
🎯 फ्रँचायझीद्वारे मराठी उद्योजक निर्माण करणे
जास्तीत जास्त युवकांना व्यवसायाच्या संधी
. -
🎯 जागतिक स्तरावर “Missal is Marathi” हा ब्रँड-पायंडा निर्माण करणे
मराठी मिसळीला जागतिक ओळख मिळवून देणे.
